पंढरपूर,टीम——
यंदाच्या वर्षी पंढरी नगरीमध्ये आषाढी यात्रा सोहळ्याकरता लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक भक्त दाखल झाले आहेत. या गर्दीमध्ये परप्रांतीय फेरीवाले ही मोठ्या संख्येने आले आहेत,या परप्रांतीयांना कायमचा आवर न घातल्या गेल्यामुळे रस्त्यावर गर्दीमध्ये पुन्हा एकदा या परप्रांतीयांची घुसखोरी होत आहे. सध्या पंढरीमध्ये स्थानिकांना दंडू आणि परप्रांतीयांना मात्र मोकळीत असल्याचेही विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

आषाढी यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने परप्रांतीय फेरीवाले पंढरी नगरीमध्ये येत असतात. या परप्रांतीयांना आवरणे प्रशासनाला अक्षरशः नाकी नऊ होत असते,कारण हे परप्रांतीय सतत प्रशासनाला चकवा देत असतात.साहेब किंवा साहेबांची गाडी दिसतात परप्रांतीय चुटकी सरसे गायब होतात व गाडी जातात पुन्हा भाविकांच्या गर्दीमध्ये घुसून आपला व्यवसाय मनमोकळे प्रमाणे करत असतात. हा प्रकार महत्त्वाच्या गर्दीच्या रस्त्यांवर वारंवार होत असतो.

गजानन महाराज मठ परिसर, स्टेशन रोड, सावरकर चौक,भक्ती मार्ग,मंदिर परिसर या भागात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय विक्रेते खुलेपणाने आपल्या वस्तू विकताना पाहावयास दिसून येत आहे.या परप्रांतीयांना कायमचा आवर घालण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.मध्यंतरी प्रशासनाने स्थानिकांनी केलेले अतिक्रमणावर दंडुका चालवला परंतु प्रशासन तसाच दंडुका परप्रांतीयांवर चालवत नसल्यामुळे परप्रांतीयांची वारंवार घुसखोरी ही वारीमध्ये नेहमीचाच विषय बनली आहे. या परप्रांतीयांमुळे जर एकादशी दिवशी मोठी दुर्घटना झाली तर त्या जबाबदार कोण राहणार?असाही सवाल आता उपस्थित होत आहे. कारण साहेब आले पळापळा पळा,गायब व्हा आणि साहेब जातात पुन्हा आपल्या वस्तू विका असा प्रकारही पंढरीत वारी काळात घडत आहे.
