
पंढरपूर, टीम——
राज्यभरात मराठा आरक्षण चळवळीचा वणवा पेटवून मराठा बांधवांना त्त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच प्रतिनिधी संजय देवळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, पांडुरंग पवार, संतोष पवार, विकास पवार, माजी सरपंच दिलीप पवार, सिद्धेश्वर पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल आपण सर्वांनी जाणीव ठेवत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. तसेच 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी विष्णू साळुंखे, बबन साळुंखे, सत्यवान जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पवार, ऋषिकेश पाटील, मुख्याध्यापक अजितकूमार बिराजदार शिक्षक बालाजी भोकरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.