Vector illustration of a thief running away with the money

पंढरपूर, टीम ——
सध्या चोरी व लुटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत जात असल्याची पहावयास मिळत आहे महाराष्ट्राच्या सेमी लगत असणाऱ्या विजयपूर जिल्ह्यातील चडचण येतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अज्ञात पाच बंदूकधारी दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांची हातपाय बांधून जवळपास आठ कोटींची रोकड व पन्नास किलो सोने लुटून नेण्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चडचण शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी हे दैनंदिन कामकाज संपल्यानंतर सायंकाळी नेहमीप्रमाणे बँकेत उर्वरित काम करत असताना अचानक 5 बंदूकधारी दरोडेखोर कार मध्ये येऊन बँकेत शिरले त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत बंद केले त्यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेऊन रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे कारण शहरातील मुख्य रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे.

सदर दरोडेखोर हे महाराष्ट्राच्या दिशेने कारमधून आल्याचा पोलिसांना संशय असल्याने कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना याबाबत सतर्क केली आहे.विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निम्बर्गी,इंडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक आर जगदीश, चडचणचे सीपीआय सुरेश बेंडेगुम्बाळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत दरोडाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती,रकमेबाबत पोलिसांनी दुसरा दिलेला नसल्याचे समजत असून या घटनेमुळे मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलीस प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे कारण कोट्यवधींचा डल्ला बँकेवर दरोडेखोरांनी मारला आहे.
