पंढरपूर, टीम —–
स्वस्त धान्य दुकानातून मिळत असलेल्या रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकून उघडकीस आणला आहे, यामुळे पंढरपूर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळच्या मोकळ्या जागेत रेशनचे धान्य वितरण करणाऱ्या सहा ट्रक उभे होत्या यामधील 2 ट्रक मधून खाजगी पिकअप मध्ये रेशनचा गहू तांदूळ भरला जात होता या ठिकाणी साईनाथ बडवे, सुमित शिंदे या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.

शासकीय नियमानुसार रेशन चे धान्य हे शासकीय गोदामातून शासकीय गाडीमध्येच भरून रेशन दुकानापर्यंत पोहोचवले जाते मात्र काळाबाजार करण्याच्या हेतूने शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी रेशनचे धान्य खाजगी गाडीत भरले जात होते. या काळाबाजार मुळेच अनेक लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस देखील हजर झाले. या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांनी गाड्या ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेल्या.

सध्या सोलापूर जिल्ह्यात पुराने मोठे थैमान घातले आहे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी रेशन धान्याचा काळाबाजार सुरू असून या प्रकरणात पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचाही आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शासकीय धान्य गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर आहे शासकीय धान्य खाजगी वाहनातून भरून इतरांना दिले जात असताना शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी पकडले आहे पुरवठा विभाग आणि पोलिसांना खाजगी वाहनास दोन शासकीय धान्याचे ट्रक ताब्यात घेतले आहेत.
–बालाजी पुदलवाड, नायब तहसीलदार
साधारणपणे 1000 टन धान्य बेकादेशीर रित्या वाटप करताना निदर्शनास आले आहे पंढरपूरच्या तहसीलदारांना वारंवार फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही पुरवठा अधिकारी व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांनी पाठवले स्थानिक तहसीलदार हे ठेकेदारांना पाठीशी घालत असून त्यांना अवैध धंदे करण्यासाठी पाठबळ देत आहेत
-साईनाथ बडवे शिवसेना नेते शिंदे गट
ठेकेदाराची उडवाउडवी ची उत्तरे—–
खाजगी ठिकाणी आम्ही कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळ भाड्याने जागा घेऊन मोकळ्या जागेत रेशनचे धान्य वितरित करत आहोत या ठिकाणी आमचे सुरक्षा रक्षक असल्यामुळे काही अडचण येत नाही असे परशुराम हजारे वाहतूक ठेकेदार यांनी सांगितले आहे.
