
भवानीनगर,प्रतिनिधी
गोकुळ (बापू) टांकसाळे
इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी येथील घोलप कुटुंबातील पृथ्वीराज श्रीनिवास घोलप हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून आज पर्यंत सर्व सामान्य जनतेला सर्वतोपरी मदत करून अतिशय थोड्या दिवसांमध्ये सर्व समाजामध्ये घोलप यांनी नावलौकिक मिळावळा आहे.
शेती या व्यवसायाबरोबर बारामती या ठिकाणी घोलप ऑटोमोबाईल्स या नावाचे फर्म काढून या व्यवसायात 58 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याचबरोबर एक्साइड बॅटरी या कंपनीचे डीलरशिप घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू केला साधारण बारा वर्ष या व्यवसायाला झाले असून याबरोबर कंट्रक्शन मध्ये देखील चांगले नाव कमावले आहे.
व्यवसायाची जोड ही घोलप घराण्याने ओळखली व त्याचा विचार करून पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांनी घोलप ऑटोमोबाईल्स या नावाने व्यवसाय सुरू केला लहानपणापासूनच समंजस स्वभाव असल्याने तसेच सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा स्वभाव असल्याने थोड्या दिवसांमध्ये पृथ्वीराज घोलप यांनी परिसरामध्ये आपल्या नावाचा एक समाजामध्ये आदर्श निर्माण केला. त्यांनी गोरगरीब जनतेसाठी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असून आजही ते सर्वसामान्य कुटुंबासाठी कायमस्वरूपी मदतीसाठी आग्रही असतात.
करोनाच्या काळात देखील त्यांनी स्वखर्चातून साधारण सर्वसामान्य जनतेला दवाखान्याच्या खर्चासहित लाखो रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या समाजामध्ये जगत असताना अनेक मोठमोठे गडगंज श्रीमंत असणारी व्यक्ती सर्व जनता पाहत असते. परंतु मदतीचा हात देणारी व्यक्ती फार थोडीच दिसत असतात त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीराज घोलप त्यांनी अतिशय थोड्या वर्षांमध्येच केलेले सामाजिक काम गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती गोरगरिबांच्या अडचणी असतील तर त्या काळजीपूर्वक सोडवण्याचे काम अगदी मनापासून घोलप करीत आले आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक भावना असते की त्या भावनेप्रमाणेच व्यक्ती वागत असतो व लहानपणापासूनच शांत व संयमी स्वभावाची व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मनामध्ये कायम सर्वसामान्य नागरिकांबद्दल आस्था असल्याने ते सर्व सामानांच्या मनामध्ये घर करून राहिले आहेत व त्याचाच प्रत्यय म्हणजे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या सानिध्यामध्ये पृथ्वीराज घोलप हे आले असतात तसेच पृथ्वीराज जाचक यांना आपला गुरु मानून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली व त्या कामकाजाची पावती म्हणून अतिशय चांगले व्यक्तिमत्व श्री छत्रपती कारखान्यात संचालक म्हणून असावे असे पृथ्वीराज जाचक यांना वाटले व पृथ्वीराज जाचक यांनी पृथ्वीराज घोलप यांच्या नावाची शिफारस केली त्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे वयाच्या 30 व्या वर्षीच संचालक पदी विराजमान होण्याचा मान देखील पृथ्वीराज घोलप यांना मिळाला आहे.
पृथ्वीराज घोलप यांच्या कर्तृत्वामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची संधी त्यांना मिळाल्याने पुढील काळात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील पृथ्वीराज घोलप हे कायम जनतेची सेवा करीत राहणार याची शास्वती कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना व शेतकऱ्यांना वाटत आहे कारण आजपर्यंतचा इतिहास पाहता सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला उभा राहणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहिले जात आहे
अशा या सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या व नव्याने राजकीय क्षेत्रात देखील उभारी घेतलेल्या तरुण तडफदार व्यक्ती म्हणजेच पृथ्वीराज घोलप त्यांना श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांकडून वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा.