
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
पंढरपूर,टीम—
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक दिवसांपासून संघर्ष करणारे संघर्ष योध्या जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला असूनआ समाजाच्या मुलांच्या कल्याणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बंडू पवार यांची कन्या मयुरी आणि धनंजय नागटिळक यांचे सुपुत्र प्रज्वल यांचा विवाह 2 मे रोजी पंढरपुरात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी जरांगे पाटील उपस्थित राहणार होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत नववधूवरांना शुभेच्छा संदेश दिला.याच वेळी त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मराठा समाजाला तयार राहण्याची आव्हान केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे पुन्हा आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार करताना,
भावी पिढीच्या कल्याणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यामुळे पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारच्या विरोधात सकल मराठा समाज आपल्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.