
पंढरपूर, टीम—-
शहरांमधील रस्त्यांची नेहमीच बोंबाबोंब होत असते शहरातील रस्ते आषाढी यात्रा कालावधीत दुरुस्त केले जातात मात्र अवघ्या काही दिवसातच या रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थेच होत असल्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करत करत पंढरी नगरीमध्ये प्रवेश करावा लागत असतो आता यात अधिक भर पडली असून डी वाय एस पी कार्यालयासमोरील रेल्वे बोगद्या जवळचा रस्ता तब्बल चार आठवडे दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहणार असल्याने पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करताना इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
पंढरी नगरी मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन रेल्वे बोगद्याजवळचे रस्ते आहेत सरगम चौक आणि dysp कार्यालयाला समोरील रस्ता या रस्त्यांपैकी सरगम चौक येथील बोगद्याजवळ नेहमी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते तर अनेकदा खड्डे बुजवूनही रस्ता काही केल्या दुरुस्त होत नसल्याचे दिसत आहे.
अशीच काही ची अवस्था डीवायएसपी कार्यालयाला जवळील रेल्वे बोगद्याजवळच्या रस्त्याची आहे परंतु आता रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी भुयारी पुलाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून सोमवार दिनांक 4 ते सोमवार दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी तब्बल 20 दिवस बंद राहणार आहे सरगम चौक रेल्वे ब्रिज व टाकळी रोड रेल्वे ब्रिज याकडून पर्यायी वाहतूक सुरू राहणार असल्याचे पत्र रेल्वे विभागाने पंढरपूर नगरपरिषद, एस टी महामंडळ, तहसील व शहर पोलीस स्थानकाला पाठवले आहे.
सदर रेल्वे बोगद्याजवळ रस्ता दुरुस्त झाला त्याप्रमाणेच सरगम चौक येथीलही रस्ता दुरुस्त झाला तर पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळेल व शहरांमध्ये प्रवेश करताना इतर भाविक भक्तही खड्डे मुक्त रस्त्यामुळे सुखावल्याची पहावयास मिळतील.
पंढरपूर शहरामध्ये एन्ट्री करताना सर्वात जास्त वापर डीवायएसपी कार्यालयासमोरील बोगद्याचा केला जात असतो हा रस्ता २० दिवस बंद राहिल्यामुळे नक्की शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होईल याचा मनस्ताप मात्र पोलीस प्रशासनाला सहन करावा लागणार हे मात्र निश्चित आहे.