
पंढरपूर,टीम—–
विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन युवक नेते भगीरथ भालके यांनी रविवारी बारामती येथे जाऊन गोविंद बागेमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली भेटीदरम्यान युवराज पाटील,गणेश पाटील, विलास देठे,हणमंत पाटील,सुधीर धुमाळ,शौकत भाई,माऊली भिंगारे यांच्यासह विठ्ठल परिवारातील नेते उपस्थित होते.
याप्रसंगी शरद पवार यांनी पंढरपूर,मंगळवेढा,माढा, सांगोला तसेच मंगळवेढा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या मतदानाचा आढावा घेतला,तर मंगळवेढा मध्ये भाजप कडून समाधान आवताडे उभे राहणार आहेत तेव्हा प्रशांत परिचारक यांची भूमिका काय राहणार याबाबतही पवारांनी उपस्थित नेत्यांकडून माहिती घेतली. तसेच गणेश पाटील व युवराज पाटील यांनाही काही प्रश्न विचारले तेव्हा आम्ही आता कायमस्वरूपी एकत्र आहोत, विठ्ठल परिवार हा नव्या जोमाने एकसंघ झाला आहे असे नेते मंडळींकडून सांगितले गेले.त्यामुळे शरद पवार यांनी भगीरथ भालके यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर चर्चा ऐकावयास मिळत आहे, त्यामुळे यंदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठी चुरस विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पहावयास मिळणार आहे.कारण सोशल मीडियावर यंदा माघार नाही ही परिचारक समर्थकांनी मोहीम सुरू केली आहे तर यंदा विधानसभेच्या मैदानात मनसेही उतरणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे निवडणुकीच्या 4 ते 5 महिने अगोदरच पंढरपूर मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे.
भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे विठ्ठल परिवारासह भालके समर्थकांमधून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे,कारण भगीरथ भालके यांची घरवापासी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या कामाचे हे सर्वात मोठे राजकीय बक्षीस भगीरथ भालके यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.