
पंढरपूर, टीम—-
आषाढी एकादशी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी यात्रा सोहळ्या दरम्यान पालखी व दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये येत असतात पांडुरंगाचे दर्शन व भेट ही एकमेव आस भावीक भक्तांना राहत असते. समतेचे प्रतीक असणारा हा यात्रा सोहळा संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळवत आहे.
आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वादरम्यान पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची इच्छा सर्वांनाच असते परंतु काही कारणांमुळे ती इच्छा अपूर्ण राहत असते देवाचे दर्शन दुरून झाले किंवा विठ्ठलाचा प्रसाद मिळाला तरी भाविक भक्त समाधानी होत असतात, याच प्रांजल भावनेतून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.समाधान आवताडे यांनी पावसाळी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना विठ्ठलाचा प्रसाद दिला एवढेच नव्हे तर विधिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनाही प्रसादाचे वाटप केले . याचबरोबर विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची ही भेट घेऊन आ. अवताडे यांनी त्यांना व विधिमंडळातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विठुरायाचा प्रसाद भेट दिला. या प्रसादामुळे विठ्ठलाची अप्रत्यक्ष भेट व कृपाशीर्वाद मिळाल्याचा अनुभूती सर्वांना आली असल्याचे आत्मिक समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत आहे.
आ. समाधान आवताडे यांनी आपल्या सोशल मीडियावर पेजवर याबाबतची पोस्ट शेअर केली असून आमदार अवताडे यांच्या पोस्टला अनेक लाईक मिळत असून आ.आवताडे यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे मोठे कौतुक केले जात आहे.कारण त्यांच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापुजेचा प्रसाद थेट मुंबईतील विधानसभा व विधान परिषदेच्या दालनात व इतर सर्व सहकार्यापर्यंत पोहोचला आहे.