पंढरपूर, टीम——
विठ्ठल साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने सन 2016-17 मध्ये कारखान्याचे सभासद शेतकरी व तोंडी वाहतूक ठेकेदारांच्या नावावर कर्ज काढून ते थकीत ठेवले होते या थकीत कर्जामुळे सर्वांनाच मोठी अडचण येत होती.न्यायालयात काही खटलेही दाखल होते.संबंधितांना वसुलीचे नोटीसा येऊन सातबारावर बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, याबाबत विठ्ठलचे चेअरमन आ.अभिजीत पाटील यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला असून तब्बल 1089 सभासद शेतकरी वाहतूक ठेकेदारांना मोठा दिलासा दिला दिल असून कारखान्याच्या निवडणुकीत दिलेल्या शब्द पाळला असल्यामुळे आ.अभिजीत पाटलांचा हा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक असल्याचे सांगितले जात आहे, कारण जुन्या काळातील थकीत कर्ज नील करण्याचे धाडस आ. चेअरमन अभिजीत पाटील यांनी दाखवले आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालिन संचालक मंडळाने सन 2016-17 मध्ये कारखान्याचे सभासद शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांचे नावावर कर्ज काढून ते थकीत ठेवले होते. सदरचे कर्ज थकीत राहिल्याने बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर यांनी वसुलीची कारवाई करून संबंधित शेतकरी तोडणी, वाहतूक ठेकेदार व कामगार यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते. संबंधितास वसुलीच्या नोटिसा सोबत ७/१२ वर बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्या नावावर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळांनी कर्जे केलेली होती त्यांच्या विरोधात शेतकरी ठेकेदार व कामगार यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता.

सदर कर्जाचे प्रकरण निकाली नाही निघाली तर संबंधितांवर वसुलीची व पुढील कारवाई होणार होती. या त्रासाला कंटाळून काही शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नव्हता,परंतु विद्यमान चेअरमन व आ. अभिजीत आबा पाटील हे याबाबत संबंधित बँक ऑफ इंडियाची प्रकरणे कोर्टात असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावून मा. न्यायालय व बँक यांच्याशी समन्वयाने चर्चा करून तडजोडीने दोन्ही बँकांची कर्जे प्रकरणे ओटीएस द्वारे निकाली काढून शेतकरी सभासद ठेकेदार यांना पीक कर्ज व इतर कोणतेही कर्ज प्रकरणे करण्यासाठी भविष्यात बाधा येणार नाही. अशी तडजोड करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तब्बल 1089 लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

संचालक मंडळांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संबंधित शेतकरी सभासद, कामगार व ठेकेदार यांना कारखाना स्थळी बोलवून सदर कर्जाचे बेबाकी दाखले वाटप करण्यात आले. दाखले स्वीकारताना संबंधित शेतकरी सभासद ठेकेदार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या प्रसंगी बोलतांना आ.अभिजीत पाटील म्हणाले की,विठ्ठल कारखान्याचा चेअरमन म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेच्या हिताचे निर्णय घेत आहोत. संचालक मंडळाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मध्ये दिलेला शब्द पूर्ण करत असताना आज मला मनस्वी आनंद होत आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे तडजोडीने निकाली काढत असताना पुन्हा त्याच किंवा इतर बँक सदर खातेधारकांना कर्ज देतील याची सोय केलेली आहे. कर्ज परतफेड पेक्षा शेतकरी सभासद आणि कामगार यांच्या विरोधातील वसुलीचा बडगा थांबवणे व त्यांना चिंतामुक्त करणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. या ओटीएसमुळे कोणत्याही शेतकऱ्यास बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असेल तर त्यांची अडचण दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. कारखान्याचे संस्थापक चेअरमन औदुंबर आण्णा पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रुपी लावलेल्या रोपट्यास कै.वसंतदादा, आमदार कै. भारतनाना यांनी वाढवलेले ते सांभाळण्याची जबाबदारी आम्ही संचालक मंडळावर आली असून ती आपल्या सर्वांच्या साथीने पार पाडत आहे, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे माजी संचालक तथा तत्कालीन ऊस तोडणी वाहतूक कमिटीचे अध्यक्ष दशरथ खळगे, मा. संचालक रामदास चव्हाण, नांदुरे गावचे सरपंच मारुती भिंगारे यांनी आ. अभिजीत पाटील यांचा सत्कार करून थकलेल्या कर्जची परतफेड करून कर्ज निरंक करून बेबाकी दाखले वाटप करीत असल्याबाबत आभार मानून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

याप्रसंगी संचालक तुकाराम मस्के यांनी प्रस्ताविक केले. तर स्वेरी चे संस्थापक प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे प्रा. महादेव तळेकर, संचालक जनक भोसले, सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा प्रसंगी कार्यकारी संचालक डी. आर गायकवाड, सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी अधिकारी ओंकार अवधूत यांनी केले.
