पंढरपूर, टीम—–
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे याच धामधूमीत सांगोला तालुक्यातील सोनंद येथे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली असून तब्बल 50 इसमांना हॉटेल मटन भाकरी मटन व भाकरी अत्यंत महाग पडली आहे कारण या धाडीमध्ये पोलिसांनी 2 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सोनंद येथील हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीमध्ये सचिन साहेबराव काशीद, शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा.आथनी जिल्हा बेळगाव हे विनापरवाना जुगार क्लब चालवत असल्याची बातमी मिळाली सदर ठिकाणी पंढरपूर विभागाचे सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या 4 पथकांनी धाड टाकली. तेव्हा तेथे अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे दिसून आले.

हॉटेल मटन भाकरी च्या पाठीमागील सिमेंटच्या पत्रा शेडमध्ये 50 इसम हे 52 पत्त्याच्या पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना रंगेहात सापडले आहे, तसेच कसिनो काउंटर मध्येही अवैधरित्या बेकायदेशीर देशी-विदेशी दारू काही लोक जवळ बाळगल्या स्थितीमध्ये पोलिसांना रंगीहात सापडले.

या सिमेंटच्या पत्रा शेडमध्ये पत्ते खेळण्यासाठी आलेल्या इस्मानकडे दुचाकी चार चाकी वाहने, रोख रक्कम, पत्त्यातील रक्कम,मोबाईल, जुगार साहित्य, पत्त्यांचे डाव, खुर्च्या टेबल कपाट, कुलर, पैसे मोजण्याची मशीन असे साहित्य होते यामध्ये रोख रक्कम 16 लाख 9 हजार 480,मोबाईल 62 तर 26 चार चाकी वाहने, 61 मोटार सायकली, देशी विदेशी दारू असा एकूण तब्बल दोन 2 कोटी,68 लाख 72 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत सांगोल पोलीस ठाण्यामध्ये 50 जुगारींवर महाराष्ट्र जुगार कायदा 1887 कलम 4,5 व महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभावरी रेळेकर,पोसई भारत भोसले, अनिल पाटील,दत्तात्रय तोंडले,पोलीस हवालदार निलेश रोंगे, कामतकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे,पोलीस हवालदार सुजित उबाळे, अरुण कोळवले,सातव, पोलीस हेडकॉन्स्टेबल शितल राऊत, पोलीस नाईक संतोष गायकवाड,सिताराम चव्हाण, पोना शिंदे,ढोणे, पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ, गवळी, राहुल लोंढे, आवटे जाधव, मदने, हुलजंती, यांनी पार पाडली आहे.

सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळामध्ये 52 पत्त्यांचा डाव खेळताना 50 इसम रंगेहात सापडले असून हॉटेल मटन भाकरी च्या नावाखाली सुरू असलेला हा जुगाराचा डाव मोडीत काढत पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे त्यामुळे जुगारी मंडळी व अवैध धंदेवाल्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.
