
पंढरपूर,टीम——
गोवा राज्यातील भक्तांची मांदियाळी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या भेटीसाठी आली असताना त्यांनी तालुक्यातील शेळवे गावातील सनराईज पब्लिक स्कूल ला भेट दिली तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा म्हाळशेकर, रोहिदास गावकर व्यवस्थापक सातेरी माया दिंडी पथक गोवा,चंद्रकांत सावंत, दिंडी प्रमुख सातेरी माया पथक,कृष्णा म्हाळशेकर सामाजिक कार्यकर्ते साखळी गोवा,प्रा.दि.बा.पाटील ज्येष्ठ कादंबरीकार सांगली, धोंडीराम सिद माजी संचालक वारणा बँक,चंद्रकांत निकाडे अध्यक्ष मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, जालिंदर नांगरे, सचिव राधाकृष्ण भजनी मंडळ घुणकी, बाबुशेठ पांडकर आयुर्वेदाचार्य सासवड,डॉ.श्रीकांत पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक कोल्हापूर आदी उपस्थित होते.
विठ्ठलाच्या दारी कीर्तनाचा गजर करण्यासाठी या विठ्ठल भक्तांची मांदियाळी आली होती.मिळालेल्या वेळात त्यांनी सनराईज पब्लिक स्कूल ला भेट दिली.तब्बल सहाशे किलोमीटर वरून विठ्ठल भक्तांची मांदियाळी आपल्या प्रशालेस भेट देण्यासाठी येत आहे म्हटल्यावर प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद आनंदून गेला,”साधू संत येती घरा,तोचि दिवाळी दसरा”संतांच्या या वचनाप्रमाणे सर्वांनी गोवेकरांच्या दिंडीचे स्वागत आणि आदरसत्कार केला.
गोव्याच्या या पाहुण्यांनी प्रशालेसाठी जवळपास २५ ते ३० काजू,नारळ, सुपारी,आंबा,बॉटल पाम,फणस, जांभूळ अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे भेट म्हणून आणली होती,सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले,तसेच प्रशालेतील ग्रंथालयासाठी एक ग्रंथ लॉकर भेट दिला,सनराईज परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांच सत्कार करण्यात आला.
जेष्ठ साहित्यीक अनुराधा ताई म्हाळसेकर,रोहिदास गावकर तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व जेष्ठ लेखक डॉ.श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून निसर्गरम्य वातावरणातील सर्वांगसुंदर शाळा असं वर्णन सनराईज पब्लिक स्कूल चे केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रामीण साहित्यिक,सचिव अंकुश गाजरे यांनी केले तर मान्यवरांचे आदरातिथ्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे, उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मोहन गायकवाड यांनी तर नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख योगेश गायकवाड,राम मोकळे,कबीर शेख तसेच सर्व अध्यापिका व कर्मचारी वृंद यांनी केले.
पर राज्यातून एका ग्रामीण भागातील प्रशालेस इतके मोठे मान्यवर भेट देण्यासाठी आल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांकडून प्रशालेचे कौतुक होत आहे,या पूर्वी ही सनराईज पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस मुंबई,विदर्भ-कोकण,मराठवाडा येथील मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत.