पंढरपूर,टीम—–
पंढरपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सध्या अवैध धंद्यांचा उत आला आहे, हे धंदे पूर्णपणे बंद करण्याकडे प्रशासन फारसे लक्ष देत नसल्यामुळेच आज अनेक ठिकाणी संसार उध्वस्त होत आहे तर काही ठिकाणी अक्षरशः तरुण पिढी बरबाद होत असल्याचे विदारत चित्र पाहावस मिळत आहे, यामुळे आता ग्रामस्थांनीच पुढाकार घेत अवैध धंदे बंद करण्यासाठी मोहीम उघडल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे मात्र पोलिसांची चांगलीच पळापळ तर महिलांमधून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे कारण विस्कटलेल्या संसाराचे कल्याण होण्यास सुरुवात झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बंडू पवार यांची निवड झाली. त्यानंतर तात्काळ ग्रामसभा घेत दारूबंदीसाठी पवार यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. ग्रामसभेने बहुमताने ठराव मंजूर करून दारूबंदी झालीच पाहिजे असा ठराव मंजूर केला आणि तंटामुक्त समितीच्या पहिल्या सभेतही याबाबत चर्चा झाली,तेव्हा करकंब पोलीस स्टेशनच्या वतीने तात्काळ दारू बंद करून असे आश्वासन देण्यात आले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी आपली टीम कामाला लावून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.यामुळे महिला वर्गातून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे कारण बिघडलेल्या संसाराची घडी पुन्हा एकदा सुरळीत होत असून संसाराचे कल्याण होण्यास सुरुवात झाली आहे आणि गावाला खमक्या तंटामुक्त अध्यक्ष मिळाल्यामुळे तरुणांसह गावकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात असून या गावातील ग्रामस्थांच्या एकीचे तालुका वासियांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.कारण एक अख्खे गाव आता दारू बंदीच्या वाटेवर आले आहे.

पोलीस अलर्ट परंतु उत्पादन शुल्क विभाग अंधारात
खेडभोसे गावात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतले आहे परंतु याबाबत अद्यापही उत्पादन शुल्क विभाग अंधारात जाच पडत असल्याची पहावयास मिळत आहे कारण या विभागाकडून कुठलीही कारवाई झाली नाही याउलट आम्ही आमचेच कार्यक्षेत्र हुडकत आहोत असे सांगून यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
