पंढरपूर,टीम——
तुतारी वाजवणारा माणूस’ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना “पिपाणी” हे निवडणूक चिन्ह दिले होते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ऐवजी ‘पिपाणी’ला अनेक ठिकाणी मतदान मोठ्या प्रमाणावर झाल्याचा राष्ट्रवादीने दावा केला होता. सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला लक्षणीय मतं पडली आहेत.यामुळे पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार यांच्या गटाने केली होती.निवडणूक आयोगाने अखेर पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.यामुळे शरद पवार यांच्या गटाला हा मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभेच्या निवडणुकी नंतर पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला मिळणारी मतं फुटली आहेत, असं पवार यांच्या राष्ट्रवादीनं म्हटलं. रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना कित्येक मतं पडली आहेत.
रावेर-एकनाथ साळुंके यांना 43 हजार 957,दिंडोरी- बाबू भगरे (सर) यांना 1 लाख 3 हजार 632, भिवंडी- कांचन वखरे यांना 24 हजार 625 मते, बारामती- शेख सोएलशहा यांना 14 हजार 917 मते, शिरुर- मनोहर वाडेकर यांना 28 हजार 324, अहमदनगर- गोरख आळेकर यांना 44 हजार 597, बीड- अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते, सातारा- संजय गाडे यांना 37 हजार 62 मते पडली आहेत.

साताऱ्यात बाजी पालटली असती ……
साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.यामुळे येथे नक्की बाजी पलटली असल्याचे दिसून आले असते.

यामुळे घात केलेल्या पिपाणी चिन्हा बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.कारण तुतारी वाजवणारा माणूस व पिपाणी हे चिन्ह सारखे दिसत असल्यामुळे मोठा वांदा झाला होता.यावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत पिपाणी हे चिन्ह आता कायमचे गोठवली आहे त्यामुळे शरद पवार यांचा हा मोठा विजय असल्याचे पहावयास मिळत आहे.
