माळशिरस आणि इंदापूर तालुक्यातील ५ जणांवर गुन्हा दाखल
पंढरपूर-टीम ——
पंढरी नगरीमध्ये सध्या आषाढी यात्रेची धामधूम सुरू आहे अशातच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडून मोठी दबंग कारागिरी करण्यात आली असून शहरात मोटरसायकल चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांच्या हातात चोरी करण्या अगोदरच बेड्या पडल्या असून शहरातून चोरीस गेलेल्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात गुन्हे अन्वेषण विभागास यश आले आहे. सुमारे ५ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या या मोटारसायकली असल्याचे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सांगितले.

पंढरपूर शहर आणि परिसरातून मोटारसायक्ली चोरीस गेल्याच्या तक्रारी) दाखल झालेल्या होत्या, त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने या गाड्यांचा तपास हाती घेण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरी जाणेचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करण्यात आले. गोपनीय बातमीदारकडून मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढणेचे काम सुरू होते.
या प्रसंगी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार पंढरपुर शहरामध्ये बाहेर गावावरून काही आरोपी चोरी करण्या करीता येत आहेत असे समजले. गणेश बाळासो जाधव (रा. जाधववाडी ता माळशिरस) विकास महादेव पवार ( रा. व्हावीरूई, ता इंदापुर जि पुणे) सूरज लाला पवार (रा. वालचंदनगर रोड कळंब ता इंदापुर अतुल बाळु तुपे (रा. इंदिरा नगर कळंब ता इंदापुर) ओंकार अनंद वाघमोडे (रा ६१ फाटा माळशिरस) अशी मोटार सायकल चोरांची नावे निष्पन्न झाली.

पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एकुण ८ गुन्हयाची कबुली दिली आहे. या कबुलीमुळे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोटारसायकली चोरी उघडकीस आली. पोलिसांनी त्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मोटरसायकल चोरी करण्या अगोदरच चोरांना जेरबंद बंद करण्यात यश आले आहे.
