
पंढरपूर,टीम——-
शहरात अवैध वाळू उपस्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे गाव गुंडाच्या टोळ्या वाढत आहे.या टोळ्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी पुढाकार घेतला असून इसबाबीत अवैध वाळू उपस्यावर कारवाई करत तब्बल 45 लाख 16 हजारांचा मुद्देमाल जमा करून 6 वाळू माफियांना दणका दिला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी साडे बाराच्या सुमारास जुना अकलूज रोड येथील श्रीनाथ मंगल कार्यालया शेजारी इसबावी (पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी पथक पाठवून छापा मारला.

अंधाराचा फायदा घेऊन एक टिपरचालक व जेसीबी चालक ही पळून गेला. मात्र दुसऱ्या टिप्पर चालकाला पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडले.
या कारवाईत १६ लाख ५० हजार रुपये किमतीचा एम एच १३ ए एच ०४७१ या क्रमांकाचा जेसीबी, १५ लाख हजार रुपये किमतीचा विनाक्रमांकाचा टिप्पर, १३ लाख ५० हजार रुपये किमतीचा क्रमांक खोडलेला टिप्पर, व १६ हजार रुपये किमतीची आठ ब्रास वाळू असा एकूण ४५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिजीत शरद लोकरे (रा. शिरढोण, ता. पंढरपूर) व महेश शिंदे (रा. इसबावी, ता. पंढरपूर) यांच्यासह अनोळखी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दनानले आहे. कारण शहरातील वाढत्या गुंड गिरीचा कायमचा नायनाट करण्यासाठीची पहिली सुरुवात वाळू माफियांपासून सुरु झाल्याचे सांगितले जात असून नूतन dysp प्रशांत डगळे यांनी हाती ठोस कार्यकर्म घेतला आहे.
