filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0009,0.0000; brp_del_sen:1.0000,0.0000; motionR: null; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2097152;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 172.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 36;
पंढरपूर, टीम —-
शहर स्वच्छ सुंदर व प्लास्टिक कचरामुक्त व्हावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी घालण्यात आली आहे परंतु या बंदीचा सध्या पंढरपूर शहरात सर्वत्र बोजवारा उडत असल्याचे पहावयास मिळत आहे कारण मागेल त्याला मागेल त्या ठिकाणी कॅरीबॅग उपलब्ध होत आहे.

प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत असल्यामुळे पन्नास मायक्रोन जाडीपेक्षा खालच्या असणाऱ्या कॅरीबॅग वर बंदी लावण्यात आली आहे पंढरपूर शहरातही मागील काही दिवसांपूर्वी मोठी धडक मोहीम राबवून प्लास्टिक कॅरीबॅग विक्री ते व दुकानांवर धाड टाकण्यात आली होती त्यामुळे काही दिवस प्लास्टिक कॅरीबॅग बंदी शहरांमध्ये दिसली परंतु सध्या नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे सर्रासपणे कॅरीबॅग विकल्या जात असून ग्राहकांनाही कॅरीबॅग खुल्या पद्धतीने दिल्या जात आहेत.

भाजी मंडई,बाजारपेठ यासह इतर ठिकाणी व हातगाड्यांवर अक्षरशा कॅरीबॅग चे मोठमोठे ढिगारे खुल्या पद्धतीने विक्रेत्यांकडून ठेवले जात आहे, यामुळे मागील त्याला मागील त्या वस्तूसाठी कॅरीबॅग उपलब्ध होत आहे.

एकीकडे नगरपरिषद पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी युद्ध पातळी प्रयत्न करीत आहे,मात्र दुसरीकडे शहरातच प्लास्टिक बंदीचा बोजवारा उडत आहे.

याबाबत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची विचारणा केली असता मधल्या काळात प्लास्टिक कॅरीबॅग बद्दल नवीन जीआर काढण्यात आले आहेत, परंतु नेमकी किती मायक्रोन च्या खालील कॅरीबॅग वर बंदी आहे याबाबत त्यांच्याकडून कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही यामुळे जर प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच शासन जीआर बाबत माहिती होत नसेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत असून यामुळेच खुल्या पद्धतीने मागेल त्याला मागेल त्या वस्तूसाठी पंढरी नगरीमध्ये कॅरीबॅग उपलब्ध होत आहे. या मुळे शहरांमध्ये प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होणार असून याचा नाहक त्रास मात्र नागरिकांनाच भोगाव लागणार आहे.
