पंढरपूर, टीम——
संपूर्ण पंढरपूर शहर व उपनगर स्वच्छ व पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत तर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नूतन सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्याकडूनही त्यांच्या सोबत मैदानात येत प्रयत्न केले जात आहेत याचाच एक भाग म्हणून पंढरीतप “पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025” चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना हजारो रुपयांची बक्षीस मिळणार आहे.

पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर पोलिस प्रशासन यांच्या वतीने
“स्वच्छ-सुंदर हरित पंढरपूर” या संकल्पनेवर आधारित
सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची आव्हान केले असून सहभागी मंडळांना पर्यावरण-स्वच्छता जनजागृती सोबतच आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत विजेते मंडळांसाठी प्रथम क्रमांक – 21,000 व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – 15,000, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रतृ,तृतीय क्रमांक – 10,000, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र या प्रमाणे बक्षीस हे ठेवण्यात आले आहेत
स्पर्धेतील निकष पुढील प्रमाणे ——
✔ पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट
✔ ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण, पारंपरिक वाद्यांचा वापर
✔ सामाजिक उपक्रम
✔ प्लास्टिक मुक्त जनजागृती व डस्टबिनचा वापर
✔ वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता असणार आहेत.

या स्पर्धेत ज्या मंडळांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नाव नोंदणीची दिनांक 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 पर्यंत करावयाची असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधटराव-9370853285,जोजारे-7020286147,पोलीस हवालदार पवार- 9823990732 यांच्याकडेही संपर्क साधता येईल तसेच 4075/अ, भादुले चौक, पंढरपूर येथील कार्यालयातही संपर्क होऊ शकतो.

🔗 नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा.
#पर्यावरणपूरकगणेशोत्सव #स्वच्छसुंदरपंढरपूर #Pandharpur #इकॉफ्रेंडलीगणेशोत्सव
शहरातील गणेश मंडळ व भक्तांसाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने ही अनोखी पर्वणी उपलब्ध करून दिली असल्यामुळे गणेश भक्तांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

