शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी साधला मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षकांशी संवाद
पंढरपूर, टीम——
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने शिक्षक संवाद उपक्रमाचे व मुख्याध्यापक लिपिक व शिक्षक कार्यशाळेचे आयोजन येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड येथे करण्यात आले होते.

यावेळी सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, पंढरपूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, विवेकवर्धिनी विद्यालयाचे प्रा.डाॅ.यु.आर.मुंढे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडीमेटला, वरिष्ठ सहाय्यक अनिल पाटील,श्रीकांत धोत्रे, गुरुदाप्पा रेवे,अतिरिक्त मुख्य लिपिक राजगुरू उपस्थित होते.

शिक्षक संवाद दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत ५६ शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे निवारण करण्यात आले.
या शिक्षक संवाद बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यातील मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यात १०८५ माध्यमिक शाळा असून साडेतीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. यासाठी ७५०० शिक्षक काम करत आहेत.शिक्षक, पालक आणि शाळांची कामे प्रलंबित राहू नयेत. यासाठी तालुकास्तरावर शिक्षक संवाद उपक्रमाद्वारे जाग्यावर तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे. याचबरोबर एक कोटी वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून वृक्षारोपण कार्यक्रम याचबरोबर घरघर संविधान, डिजिटल शाळा या विविध उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक शिक्षक आणि लिपिकांना देण्यात आली.

या कार्यक्रमामुळे शिक्षक मुख्याध्यापक व लिपिक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे कारण तक्रारीचा निफ्टर तालुका स्तरावर होऊ लागला आहे आणि ही सकारात्मक सुरुवात नक्कीच सर्वांना दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे.
