पंढरपूर,टीम—–
शिक्षण क्षेत्राला कायम विनाअनुदान हे तत्व भूत बनून मागे लागले होते, परंतु शिक्षक संघटना व शिक्षक नेत्यांनी वारंवार पाठपुरावा करत शासनासोबत मोठा संघर्ष केल्यामुळे शासनाने कायम शब्द काढून विनाअनुदान हे तत्व ठेवले परंतु आता विनाअनुदान शिक्षकांना वयाच्या चाळीशी नंतरही पगारासाठी वणवण भटकावे लागत आहे. पुणे विभागात शालार्थ आयडी प्रलंबित असलेल्या जवळपास 1000 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे आयुष्य अंधकारमय झाले असल्यामुळे याबाबत आता मा.शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर आक्रमक झाले असून शासनाबरोबर आरपारची लढाई त्यांनी सुरू केली करत 4 जुलै च्या अगोदर पुणे विभागातील सर्व प्रलंबित शालार्थ आयडी द्या याबाबतचे पत्र माध्यमिक व उच्च शिक्षण संचालक पुणे यांना दिले आहे.

माध्यमिक शाळा मधील शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सध्या बऱ्यापैकी मिटला आहे.परंतु कनिष्ठ महाविद्यालया मधील शिक्षकांना आजही पगारासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सन 2023 साली पुढील टप्पा व नवीन अनुदान तरतुदीसह दिले होते परंतु शिक्षकांना शालार्थ आयडी न मिळाल्यामुळे वर्षभरानंतरही त्यांचे वेतन झालेले नाही. यामध्ये बहुदांश शिक्षकांनी वयाची चाळिशी पार केली आहे. 18 ते 20 वर्षानंतरही त्यांचा अनुदाणाचा प्रश्न सुटलेला दिसत नाही त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात अंधार आला आहे. याबाबत शिक्षण खात्याकडून केवळ आश्वासनाची खैरात मिळत आहे,मात्र शालार्थ आयडी देण्याबाबत अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळेच आता कृती समिती आक्रमक झाली असून मा.आमदार दत्तात्रय सावंत यांनी 4 जुलैपर्यंत शालार्थ आयडी न मिळाल्यास शासनाबरोबर दोन हात करण्याची तयारी सुरू आहे.

यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी यापुढील काळात शासनासोबत प्रलंबित शालार्थ आयडी साठी मोठी आरपारची लढाई होणार असल्याचेही पहावयायास मिळणार आहे.
