पंढरपूर, टीम —-
संपूर्ण शहर व उपनगर लिंक रोड भागातील 2 पाण्याच्या टाकल्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या टाक्यांमध्ये शुद्ध पाणी टाकण्यासाठी फिल्टरचा शेडलींग टँक आहे. हा टँक पाणी शुद्ध करतो.4 महिन्यापूर्वी ही टाकी धुतली होती.आषाढी यात्रेमुळे आता पुन्हा एकदा शेडलींग टँकने स्वच्छ करण्यात आले,यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या व दुर्गंधीयुक्त पाण्यातून बाहेर येणारे मासे पकडण्यासाठी कॉलेज चौकात एकच धावपळ झाली, यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली आणि पंढरपूरकरांच्या आरोग्याची अक्षरशः ऐसी की तैसी झाल्याचेही दिसून आले.

लिंक रोड येथे पंढरपूर नगरपरिषदेचा पाणी शुद्धीकरण प्लांट आहे.या ठिकाणी पाणी फिल्टर टाकी असून सदर टाकी मागील 4 महिन्यापूर्वी धुतली होती पण सध्या आषाढी यात्रा जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा शेडलिंक टाकी स्वच्छ करून घेतली आहे. या टँकद्वारे निघालेले घाण पाणी कॉलेज चौकातून खाली ओढ्याला गेले, परंतू येथे एका कोपऱ्यात उघडी गटार आहे, याच गटारीत जाळी लावून टॅंक मधून निघालेले मासे पकडण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. आणि हे विदारक चित्र पंढरपूरकरांनी दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले त्यामुळे आपण हेच मासे खातो का असेही शंका अनेकांनी उपस्थित केली.

याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधला असता यापुढे टाकी धुतल्यानंतर दक्षता घेतली जाईल असे सांगून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले परंतु दिवसाढवळ्या ज्या घाण पाण्यातून मासे पकडले जात होते त्यांचे काय असाही सवाल उपस्थित केला गेला.
नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्यांना नक्की कोण आवर घालणार हा ही सवाल उपस्थित होत आहे, कारण टाकीमधून निघणारे पाणी अतिशय दुर्गंधी होते त्याच पाण्यात मासे पकडण्यासाठी झुंबड झाली आणि कॉलेज चौकात वाहतूक कोंडी चा सामना अनेकांना करावा लागला.
