माढा तालुक्यातील 208.2 किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा
पंढरपूर, टीम——
माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिजीत पाटील यांचा विकास कामांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे समाधान करण्यासाठी त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे.नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आदेशान्वये तालुक्यातील एकूण 208.2 किलोमीटर लांबीचे रस्ते दर्जोनित करून प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच तालुक्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावला असून आ. पाटलांच्या या दमदार कामगिरीचे ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, हा निर्णय हा केवळ रस्ते दळणवळणापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) पुणे मंडळाच्या प्रस्तावानुसार व जिल्हा परिषद सोलापूरच्या ठरावाच्या अधीन राहून शासनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे माढा तालुक्यातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार आहे.
या निर्णयामुळे माढा तालुक्यातील महत्त्वाचे गावोगावचे रस्ते आता प्रमुख जिल्हा मार्गांत समाविष्ट झाले असल्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व नव्याने होणाऱ्या विकासकामांसाठी निधी मिळण्यास प्राधान्य, शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला सोयीसुविधा उपलब्ध होणार असून एकूण 4749.170 कि.मी. प्रमुख जिल्हा मार्गांच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचा समावेश होणार आहे.

तालुक्याचा शाश्वत विकास हाच माझा ध्यास-आ. पाटील
शासनाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मिळवलेला हा निर्णय माढा तालुक्याच्या जनतेसाठी एक मोठा टप्पा आहे. या रस्त्यांवर दर्जेदार विकासकामे करून नागरिकांना सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.”
“माझ्या मतदारसंघातील लोकांच्या सोयीसाठी रस्ते हा विकासाचा कणा आहे. शासनाने दिलेला हा दर्जा केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नसून, तो माढा तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाचा नवा मार्ग मोकळा करणारा ठरणार आहे. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अधिकारी वर्ग व शासनाचे मनःपूर्वक आभार.

या रस्त्यांचा जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढवण्यात आला—-
1-केम भोगेवाडी ढवळस कुर्डुवाडी चिखहील तडवळे वडशिंगे दारफळ केवळ ते मानेगाव रस्ता
2-कुर्डू बारलोनी शिंगेवाडी नाडी मुंगशी परांडा रस्ता,
3- निमगाव टे ते उपळवटे सातोली कंदर रस्ता,
4-उपळवटे ते पिंपळखुटे कुर्डू घाटणे रस्ता,
5-परिते सापडणे टे कारखाना निमगाव टे शेडशिंगे शिराळ लऊळ सापडणे भो रस्ता,
6-पिंपळनेर भुईचे आहेरगाव परिते परितेवाडी रस्ता,
7- बेंबळे घोटी चांभार विहीर रस्ता,
8-केम भोगी कवे शिंगेवाडी रस्ता,
9-महादेव वाडी बारलोणी अकुलगाव चिंचगाव रामा 145 तडोळे वडाचीवाडी जाधववाडी रस्ता,
10-रामा 202 ते लोंढेवाडी कुंभोज रस्ता,
11- केवड अंजनगाव उ.वडाचीवाडी अ. उ.गुळपोळी रस्ता
