
पंढरपूर, टीम —–
गोपाळपूर ता. पंढरपूरच्या ओसाड माळरानावर सुरू झालेले स्वेरी कॉलेज जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठी क्रांती करत जात असल्याचे पहावयास मिळत आहे नेहमीच विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन व गुणवत्ते बाबत जिल्ह्यात अव्वल नंबर असणाऱ्या कॉलेजमध्ये आता नवीन बहुउद्देशीय इमारत, लॉ कॉलेज,विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज असे जिल्ह्यातील पहिले क्रीडांगण यांच्या उद्घाटनासह मुलींच्या नऊ मजली चौथ्या वस्तीगृहाचा पायाभरणी सोहळा रविवारी संपन्न होणार आहे त्यामुळे स्वेरीने एक नवा इतिहास रचला असल्याचे पाहावयास मिळणार आहे कारण महाविद्यालयीन स्तरावर सुसज्य भव्य दिव्य असे डे नाईट मॅचेस खेळल्या जाणारे क्रिडांगणा गोपाळपूरच्या माळरानवर स्वेरीने तयार केले आहे.

गेल्या 27 वर्षापासून श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी या संस्थेच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना देण्याचे काम आजवर झाले आहे. गोपाळपूरच्या ओसाड माळावर तंत्रशिक्षणाची ज्ञानगंगा स्वेरी मुळे प्रवाहित झाली असून त्यामुळे ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी घडत आहेत हे महाविद्यालय रौप्य महोत्सवी वाटचाली सोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या श्रेणित असणाऱ्या विधी महाविद्यालयाची सुरुवात ही आता करत आहे तसेच नवीन बहुउद्देशीय इमारत, सुसज्ज असे भव्य दिव्य क्रीडांगण यांच्या उद्घाटनासह मुलींच्या नऊ मजली चौथ्या वस्तीगृहाचा पायाभरणी सोहळा रविवारी सकाळी ८:३० वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहेत.

या प्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी आ.समाधान आवताडे,अभिजीत पाटील,राजू खरे, डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, प्रशांत परिचारक राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्वागतोस्तुक संस्थापक प्राचार्य डॉ. बीपी रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. डॉक्टर सुरज रोंगे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ व स्वेरी परिवार राहणार आहे.

या कार्यक्रमामुळे पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वेरी च्या माध्यमातून नवीन इमारतींची भर व एक नव्या सुसज्ज अशा क्रीडांगणाची भर पडणार असल्यामुळे साहजिकच सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वेरी च्या माध्यमातून पंढरपूरचे नाव पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरले जाणार असल्याचेही पहावयास मिळणार आहे कारण स्वेरीने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास घडवण्याचा पहिला मान मिळवला आहे.
