oplus_2097152
पंढरपूर, टीम —–
आषाढी यात्रेची लगबग पंढरीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून शहरांमध्ये नव्या जोमाने विकास कामे रंगोटी व दुरुस्ती सुरू आहे याचाच एक भाग म्हणून पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने लावण्यात आलेले पूर्वीचे दिशादर्शक फलक बदलून मोठ्या ठळक अक्षरातील फलक लावले गेले आहेत मात्र एका फलकावरील चौकाचे नावच बदलण्याचा पराक्रम नगर परिषदेने केला आहे.

पंढरपूर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये नगरपरिषदेच्या वतीने दिशादर्शक लक लावले जात आहेत हे या फलकावरील अक्षरे पूर्वी लहान होती त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत होती याबाबत ओरड झाल्यानंतर नगरपरिषदेने यंदाच्या वारीमध्ये दिशादर्शक फलकांवरील अक्षरांची साईज मोठी करून पुन्हा नव्याने फलक लावण्याचा धडाका सुरू केला आहे मात्र यामध्ये अंदाधुंदी पहावयास मिळत आहे कारण संत गजानन महाराज चौकामध्ये लावलेल्या फलकामध्ये अक्षम्य चुका झाले आहेत कारण फलक संत गजानन महाराज चौकात लावला असतानाही फलकावर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे लिहिण्यात आले आहे एवढेच नव्हे तर उपजिल्हा रुग्णालय लांब दूरवर अंतरावर असतानाही त्याबाबत दिशा फलकावर दाखवण्यात आली आहे या उलट या चौकामध्ये सर्वात जास्त भाविकांकडून विचारणा पार्किंग व विठ्ठल मंदिर समितीच्या भक्त निवासी होत असते याबाबत फलकावर कुठलाही उल्लेख दिसत नाही.

ज्या चौकांमध्ये ज्या गोष्टींची भाविकांकडून वारंवार विचारणा होती त्याच गोष्टींचा उल्लेख एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या दिशादर्शक फलकांवर करणे गरजेचे होते मात्र नगरपरिषदेने उलटी-सुलटी नाव चुकीची नावे देऊन भाविकांची मोठी दिशाभूल करण्याचा जणू प्रयत्न केला की काय अशी शंका उपस्थित होत आहे हे फलक पूर्वीच्या फलकाप्रमाणेच केवळ एक कोपरा धरून वेळ राहणार आहेत कारण या फलकांचा कोणताही फायदा भाविकांना होत नसल्याचे दिसत आहेत फलक लावायचे होते तर स्पष्ट व ज्या चौकामध्ये ज्या गोष्टींची मागणी होती त्यांचाच उल्लेख करून फलक लावले असते तर नक्कीच नगरपरिषदेचे कौतुक झाले असते पण पुन्हा एकदा नगर परिषदेने आपला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
