पंढरपूर, टीम——-
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. सहयोग ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रा लिमिटेड युनिट नंबर 14 या साखर कारखान्याचा 26 वा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ दि. 12-11-2025 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता होत असून याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे,कारण जिल्ह्यात अद्यापही ऊस दराची कोंडी फुटलेली नाही.ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी सहयोगी तत्वावर हा कारखाना घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचेही सांगितले जात आहे,कारण बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडे जेवढे कारखाने आहे तेवढ्या कारखान्यांनी उच्चांक दर देण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे.

कारखान्याच्या सर्व सभासदांना विश्वासात घेत सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी कारखाना सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असून ओंकार ग्रुप कडे गेलेला तालुक्यातील पहिला कारखाना आहे.

जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे धुराडे पेटले आहे परंतु अद्यापही कोणत्याही कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडलेली नाही काही साखर कारखान्यांनी शेकडो टन ऊस गाळप करून साखरपत्यांचे पूजनही केले आहे,मात्र तरीही शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातील पहिल्या ऊस बिलाची खात्री लागलेली नाही.

ज्या -ज्या मंडळींनी उच्चांकी दराचा धपका दर देतो अशा घोषणा केल्या होत्या त्यांनीही शेतकरी सभासदांना दराच्या बाबतीत व्हेंटिलेटर वर ठेवले आहे. ओंकार ग्रुपचे चेअरमन बोत्रे पाटील यांनी आजवर जे जे कारखाने चालवण्यासाठी घेतले तेथे 3 हजाराच्या पुढे उच्चांकी दर देऊन शेतकरी सभासदांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.सभासदांसह कामगारांचे हित जपणाऱ्या या ग्रुप कडे सहकार शिरोमणी कारखाना सहयोगी तत्त्वावर गेला असल्यामुळे या कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,कारण बोत्रे पाटील ऊसदराची कोंडी फोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
बोत्रे पाटलांनी सहकार शिरोमणीच्या माध्यमातून ऊस दराची कोंडी फोडली तर नक्कीच विठ्ठल सह पांडुरंग कारखाना व जिल्ह्यातील इतर कारखानदारांचे टेन्शन वाढणार आहे कारण उच्चांकी ऊस दरामुळे उसाची पळवा पळवी होणार हे मात्र निश्चित आहे, कारण अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात ऊसालाही फटका बसला आहे.

सरकारी शिरोमणीचा बॉयलर अग्निपदीपदान व गाळप हंगाम शुभारंभ चेअरमन कल्याणराव काळे,ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थित होणार आहे.
बाबुराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुप मुळे नक्कीच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे कारण सहकार शिरोमणीने ऊस दराची कोंडी फोडल्यानंतर इतरांनाही या स्पर्धेमध्ये ताकदीने उतरावे लागणार आहे.
